रावेर (प्रतिनिधी) येथील रहिवासी अॅड. लक्ष्मण शिंदे यांची नोटरीपदी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामुळे नोटरीसाठी होणारी नागरिकांची पायपीट आता थांबणार आहे.
याबाबत केंद्र सरकारच्या कायदा मंत्रालयाच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या आदेशात तालुक्यासाठी लक्ष्मण शिंदे यांच्या नावाचा समावेश आहे. येथील नोटरीपद सुमारे चार वर्षांपासून रिक्त होते, त्यामुळे येथील नागरिकांना त्यासाठी भुसावळ येथे जावे लागत होते. अॅड. शिंदे यांच्या नियुक्तीने हा त्रास आता वाचणार आहे, नियुक्तीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.