प्रसार भारतीचा ओटीटी प्लॅटफॉर्म लॉन्च

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | सध्या सर्वत्र ओटीटी प्लॅटफॉर्म लोकप्रिय आहे. ओटीटी प्लॅटफॉर्म हा लोकांसाठी एक महत्वपूर्ण मनोरंजाचे साधन आहे. दरम्यान, या लोकप्रिय ओटीटी प्लॅटफॉर्मशी स्पर्धा करण्यासाठी, प्रसार भारतीने स्वतःचे ओटीटी प्लॅटफॉर्म देखील सुरू केले आहे. प्रसार भारतीने 55 व्या आयएफएफआय गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ओटीटी प्लॅटफॉर्म लाँच केला आहे. या प्लॅटफॉर्मचे नाव व्हेव्स् आहे. यामध्ये 65 लाईव्ह चॅनेलसह अनेक सुविधा असणार आहे. प्रसार भारतीने सोशल मीडियावर यासंदर्भात माहिती दिली आहे.

प्रसार भारतीने आपल्या एक्स खात्यावर पोस्ट करून ओटीटी प्लॅटफॉर्म लॉन्च करण्यासंदर्भात माहिती दिली आहे. या पोस्टमध्ये प्रसार भारतीने म्हटलं आहे की, ‘प्रसार भारतीने इफ्फीमध्ये व्हेव्स् ओटीटी प्लॅटफॉर्म लॉन्च केला! क्लासिक सामग्री आणि समकालीन प्रोग्रामिंगचे समृद्ध मिश्रण ऑफर करून प्रगत डिजिटल ट्रेंड स्वीकारताना नॉस्टॅल्जिया रिफ्रेश करणे हे या प्लॅटफॉर्मचे उद्दिष्ट आहे.’ या ओटीटी साठी कोणतेही सबस्क्रिप्शन शुल्क नाही. प्रसार भारतीच्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर व्हिडिओ, फ्री-टू-प्ले गेमिंग, रेडिओ ऑनलाइन स्ट्रीमिंग, लाइव्ह टीव्ही स्ट्रीमिंग, 65 लाइव्ह चॅनेल, व्हिडिओ आणि गेमिंग सामग्री असेल. या सुविधा 12 हून अधिक भाषांमध्ये उपलब्ध असतील.

Protected Content