जळगाव (प्रतिनिधी) शहरात गेल्या १९९५ सालापासून महिलांचे आकर्षक व मापशीर कपडे शिवून देण्यासाठी नावाजलेली ‘मयूर टेलर्स’ ही फर्म गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर ‘मयूर बुटिक नेक्स’ हे अत्याधुनिक डिझायनर व मनमोहक वस्त्रांचा अमर्याद साठ असलेले नवे शो-रूम सुरु करीत आहे. त्यांनी यापूर्वी २०१३ मध्ये सुरु केलेल्या ‘मयूर बुटिक’ या पंजाबी ड्रेस, कुर्तीज आणि ड्रेस मटेरिअल्सच्या शो-रूमलाही जळगावकर चोखंदळ महिला ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.
‘मयूर बुटिक नेक्स’ हे नवे शो-रूम शहरातील नटवर मॉलमधील शॉप नंबर ३ येथे स्थित आहे. गुढीपाडव्याला येथे सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले असून ग्राहकांना सकाळी ११.०० ते रात्री १०.०० पर्यंत तिर्थप्रसादाचा लाभ घेता येणार आहे. सगळ्यांनी मोठ्या संख्येने यावेळी शो-रूमला भेट द्यावी, अशी विनंती फर्मच्या संचालकांनी केली आहे.
गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर ‘मयूर बुटिक नेक्स’ चा शुभारंभ
6 years ago
No Comments