यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । ग्रामीण भागातील मराठी माध्यमातील व सेमी इंग्लिश माध्यमातील विद्यार्थ्यांना इंग्रजी विषय सोपा वाटावा त्यांना इंग्रजी अतिशय सोप्या पद्धतीने समजावे म्हणून तयार केलेल्या इंग्लिश सुपर चॅम्पस या ॲपचे उद्घाटन श्री स्वामी समर्थ ग्रुप जळगावचे अध्यक्ष मनोज पाटील यांच्या हस्ते श्री स्वामी समर्थ विद्यालय कुसुंबा एमआयडीसी जळगाव येथे करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री स्वामी समर्थ ग्रुपच्या संचालिका प्रतीक्षा पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून ग.स.सोसायटीचे माजी उपाध्यक्ष शरद पाटील उपस्थित होते विद्यार्थ्यांची इंग्रजी भाषेबद्दलची भीती दूर करून त्यांच्या चेहऱ्यावर हसू कसे आणता येईल या उद्देशाने प्रेरित झालेले आणी १६ वर्ष अमेरिकेत वास्तव्य करून भारतात परतलेले मूळचे उंटावद ता.यावल येथील रहिवाशी मनोज अरुण पाटील (ह.मु. पुणे) यांनी इत्तया ७ वी ते इत्तया १०वी पर्यंतच्या विद्यार्थ्यां साठी हे ॲप तयार करण्यात आले आहे.
पालक व विद्यार्थी या संदर्भातील अधिक माहिती हे ॲप मोबाईल मध्ये प्ले-स्टोअर मधून डाऊनलोड करू शकता किंवा सुपर चॅम्पस डॉट इन या वेबसाईटवर जाऊन अधिक माहिती घेऊ शकता.मनोज पाटील हे मुळचे उंटावद तालुका यावल येथील राहणारे असून ते सेवानिवृत्त प्राथमीक केंन्द्रप्रमुख अरूण रघुनाथ पाटील यांचे सुपुत्र असुन मनोज पाटील यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा शैक्षणीक प्रवास सोपा व्हावा यासाठी सुरू केलेल्या या अँप बद्दल त्यांचे उंटावदसह परीसरातून विशेष कौतुक करण्यात येत आहे.
या कार्येक्रमाचे सुत्रसंचालन हेमंत सोनार यांनी केले तर कार्येक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री स्वामी समर्थ विद्यालय कुसुंबा येथील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रयत्न केले.