चांद्रयान-२ नंतर कार्टोसॅट-३ अन् १३ उपग्रहाचे प्रक्षेपण

ISRO

नवी दिल्ली वृत्तसंस्था । इस्त्रोने आज १६२५ किलो वजनाच्या ‘कार्टोसॅट-३’ उपग्रहाचे प्रक्षेपण केले आहे. पीएसएलव्ही सी ४७ या ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपकाच्या मदतीने ‘कार्टोसॅट-३’ उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यात आले असून या उपग्रहांसह अमेरिकेतील १३ व्यावसायिक लघुउपग्रह देखील अवकाशात सोडण्यात आले आहेत.

आंध्रप्रदेशच्या श्रीहरिकोटा येथील सतिश धवन स्पेस सेंटर लॉन्च पॅडहून हे प्रक्षेपण करण्यात आलं. पृथ्वीची छायाचित्रं काढण्यासाठी, तसंच नकाश निर्मितीसाठी ‘कार्टोसॅट-३’ उपग्रह उपयुक्त ठरणार आहे. १३ लघु उपग्रहांमध्ये “फ्लोक-४ पी” हे १२ लघु उपग्रह असून, एक एमईएसएचबीईडी हा लघु उपग्रह आहे. ‘कार्टोसॅट-३’ उपग्रह अवकाशात पाच वर्षे कार्यरत राहणार आहे. कार्टोसॅट-३ उपग्रहामध्ये हाय रिझोल्युशनची छायाचित्रे घेण्याची क्षमता आहे.

‘कार्टोसॅट-३’ हा प्रगत उपग्रह असून त्याच्या मदतीने अधिक सुस्पष्ट छायाचित्रे घेता येतील. ५०९ किमीच्या कक्षेत तो पाठवण्यात येणार असून पीएसएलव्ही सी ४७ प्रक्षेपकाचे हे २१ वे उड्डाण आहे. पीएसएलव्ही एक्सएल या नव्या प्रक्षेपकात सहा घन इंधन मोटारी आहेत. पीएसएलव्ही सी ४७ आणखी १३ व्यावसायिक नॅनो उपग्रह घेऊन झेपावले आहेत. ते सर्व अमेरिकेचे आहेत. श्रीहरिकोटा येथून होणारे हे ७४ वे उड्डाण आहे.

Protected Content