फैजपूर प्रतिनिधी । यावल रावेर तालुक्याचे भाग्यविधाते स्व. बाळासाहेब मधुकरराव चौधरी यांनी आपल्या हयातीत सुरू केलेले कार्य पुढे चालू ठेवणे हीच खरी त्यांना आदरांजली, श्रद्धांजली ठरू शकते असे महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांनी सांगितले.
मधुकरराव चौधरी कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयात आयोजित बाळासाहेबांच्या 93 व्या जयंतीनिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाला अखिल भारतीय संत समितीचे संयुक्त महामंत्री श्री राधे राधे बाबा, येथील खंडेराव देवस्थानचे महामंडलेश्वर पुरुषोत्तम दासजी महाराज, महानुभाव पंथाचे सुरेश शास्त्री मानेकर बाबा, शास्त्री भक्ती किशोर दासजी महाराज या संतमंडळीसह परिसरातील बाळासाहेबांवर प्रेम करणारे सर्व चाहते उपस्थित होते.
महाराष्ट्र पुरोगामी होता या छोटेखानी कार्यक्रमात जनता शिक्षण मंडळाचे सचिव प्रभात दादा चौधरी यांनी स्वर्गीय बाळासाहेबांनी केलेल्या कार्य यावर प्रकाशझोत टाकला. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते स्व. बाळासाहेब मधुकरराव चौधरी यांच्या पुतळ्याला माल्यार्पण अर्पण करण्यात आली. महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांनी आपल्या मनोगतात पुढे सांगितले की स्वर्गीय बाळासाहेबांनी परिसरात शिक्षण संस्था त्याअंतर्गत विविध महाविद्यालय, साखर कारखाना आदी समाजाभिमुख उपयुक्त संस्था स्थापन केल्या. त्या पुढे टिकून ठेवणे ही काळाची गरज असून हीच त्यांना श्रद्धांजली आहे.