चोपडा प्रतिनिधी । तालुक्यातील लासुर येथील जिल्हा परिषद मुलांच्या शाळेत वातानुकूलीत संगणक लॅबचे उद्घाटन मंगला पाटील यांच्या हस्ते करण्यात आले, तर मुलींच्या शाळेतील संगणक कक्षेत सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्यात येवून त्याचे उद्घाटन जयश्री चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले आहे.
कार्यक्रमाची सुरुवात दिप-प्रज्वलाने करण्यात आली. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आत्माराम पाटील, उपसरपंच अनील वाघ आणि केंद्र प्रमुख उत्तम चव्हाण यांनी घेतलेल्या पुढाकारात हे सर्व शक्य झाल आहे. तसेच शाळा डिजिटल करण्यासाठी अनमोल सहकार्य केले. गावाचे मनोज पाटील यांची नुकतीच SP पदासाठी निवड झाली असून त्यांनी शाळेतील वातानुकूलित संगणक कक्षेला भेट दिला आहे. तसेच जळगाव जिल्ह्याचे आरटीओ जयवंत पाटील यांनी लासूर शाळेला 5 संगणक संच भेट दिले आहेत. त्याच बरोबर, सीसीटिव्ही कॅमेरा अमृतराव वाघ, प्रा.ए.के. गंभीर यांनी स्वखर्चाने दिले आहे. यामुळे जिल्हा परिषदची शाळा हि आता संपु्र्ण जळगाव जिल्ह्यातील एकमेव शाळा वातानुकूलित संगणक कक्ष व सीसीटिव्ही कॅमेरेच्या निगराणी खाली राहणार आहे.
त्याचप्रमाणे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी अरूणभाई गुजराथी तर प्रमुख पाहुणे पंचायत समितीचे सभापती आत्माराम म्हाळके, गट विकास अधिकारी बी.एस. कोसोदे, गटविकासाधिकारी भावना भोसले, अध्यक्ष शापोआ एस.जी.गजरे, जि.प.सदस्य गजेंद्र पाटील, डॉ.प्रा.निलम पाटील, जि.प.सदस्या प्रतीभा पाटील, सरपंच जनाबाई माळी, उपसरपंच अनिल वाघ, केंद्र प्रमुख उत्तम चव्हाण यांच्यासह आदी उपस्थितीत होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपसरपंच अनील वाघ यांनी केले.