पारोळा, प्रतिनिधी | येथील राष्ट्रीय सुरक्षा मंचतर्फे नागरिकता संशोधन कायद्याच्या समर्थनार्थ आज (दि.३०) राम मंदिरापासून ते तहसील कार्यालयपर्यंत भव्य मोर्चा काढण्यात आला.
भारताच्या सार्वभौम संसदेने नुकताच नागरिकत्व संशोधन कायदा मंजूर केला आहे. राष्ट्रभक्त नागरिक म्हणून आम्ही या कायद्याचे स्वागत करीत आहोत. आमचे या कायद्यास पूर्ण समर्थन आहे. राज्य सरकारने विनाविलंब हा कायदा राज्यात लागू करावा. अशी मागणी अशी राष्ट्रीय सुरक्षा मंचतर्फे एका निवेदनाद्वारे नायब तहसीलदार वंजारी यांना करण्यात आली. केवळ राजकीय हेतूने या कायद्यास विरोध करणाऱ्या घटकांचा आम्ही निषेध करीत आहोत. या राष्ट्रहिताच्या कायद्याच्या सर्वांनी सन्मान करावा, अशी अपेक्षा व्यक्त करीत आहोत. कायद्यास मंजुरी दिल्याबद्दल राष्ट्रपती, पंतप्रधान, गृहमंत्री, संसदेचे अन्य सदस्य यांचे अभिनंदनही राष्ट्रीय सुरक्षा मंचने यावेळी केले. मंचचे सदस्य रवींद्र पाटील व असंख्य समर्थक या रॅलीत उपस्थित होते.