चांद्रयानातून लँडर विक्रम अन रोव्हर प्रज्ञान यशस्वीपणे वेगळे

indiamoon feat

बेंगळुरू, वृत्तसंस्था | भारताच्या महत्त्वाकांक्षी चांद्रयान-२ मोहिमेत आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे. आज दुपारी १ वाजून १५ मिनिटांच्या सुमारास मुख्य यानातून लँडर विक्रम यशस्वीपणे वेगळे झाले आहे. भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) ट्विटरवरून याबाबत माहिती दिली आहे.

 

आता खऱ्या अर्थाने चांद्रयान-२ चा टप्पा सुरू झाला असे म्हटले जात आहे. चांद्रयानामधून वेगळ्या झालेल्या लँडरमधून रोव्हर विक्रम येत्या ७ सप्टेंबर रोजी चंद्रावर उतरणार आहे. चांद्रयान-२ ने यापूर्वीच चंद्राच्या पाचव्या कक्षेत प्रवेश केला आहे. आज चांद्रयान-२ मधून लँडर विक्रम आणि रोव्हर प्रज्ञान वेगळे झाले. ७ सप्टेंबरला चांद्रयान-२ चंद्रावर उतरणार आहे. शनिवारी वैज्ञानिकांची उच्चस्तरीय बैठक झाली. चांद्रयानाने चंद्राच्या पाचव्या कक्षेत प्रवेश केल्यानंतर लँडर आणि रोव्हरला वेगळे करण्याचा निर्णय घेतला गेला. या कक्षेपासून चंद्राचे अंतर अवघे १०९ किलोमीटर आहे.

Protected Content