Home Cities अमळनेर भूमी अभिलेख कार्यालय फोडून लॅपटॉपसह सामानांची चोरी

भूमी अभिलेख कार्यालय फोडून लॅपटॉपसह सामानांची चोरी


अमळनेर लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर शहरातील भूमी अभिलेख कार्यालयाचे दरवाजाचे कुलूप तोडून कार्यालयातून लॅपटॉप आणि इतर साहित्य चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. या संदर्भात अमळनेर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अमळनेर शहरातील स्टेशन रोडजवळ भूमी अभिलेख कार्यालय आहे. हे कार्यालय 3 एप्रिल ते 4 एप्रिलच्या दरम्यान बंद असताना अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री कार्यालयाचे कुलूप तोडून आत प्रवेश करत कार्यालयाचा लॅपटॉप इतर सामान असा मुद्देमाल चोरून नेला. दरम्यान ही घटना उघडकीस आल्यानंतर येथील कर्मचारी स्मिता गावित यांनी अमळनेर पोलिसात तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांवर शुक्रवार 11 एप्रिल रोजी सायंकाळी 5.30 वाजता अंमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल अशोक साळुंखे हे करीत आहे.


Protected Content

Play sound