जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील निमखेडी शिवारातील शिवधाम मंदीर परिसरातून एकाची दुचाकी लंपास केल्याची घटना रविवारी मध्यरात्री घडली असून याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील निमखेडी शिवारातील अहुजा नगरात राहणारे भाजीपाला विक्रेते संजय डिगंबर चौधरी (वय-४०) हे आपल्या कुटुंबियांसोबत राहतात. कृषी उत्पन्न बाजार समितीतून भाजीपाला घेण्यासाठी त्यांच्याकडे (एमएच १९, बीए ३२८६) क्रमांकाची दुचाकी आहे. रविवारी १८ ऑक्टोबर रोजी दिवसभर त्यांनी भाजीपाला विक्रीचा व्यवसाय केला. सकाळी कृउबा समितीत भाजीपाल जाण्याचे असल्याने सर्वजण लवकर झोपले. १९ रोजीच्या पहाटे ४ वाजता मार्केटला जाण्यासाठी निघाले असता त्यांना दुचाकी मिळून आली नाही. त्यांनी इतरत्र शोधाशोध केली असता मिळून आली नाही. भाजीपाला विक्रेत संजय चौधरी यांच्या फिर्यादीवरून जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. दुचाकी चोरी प्रकरणी पुढील तपास पोलीस नाईक विजय दुसाने करीत आहे.