शेंदुर्णी -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | एच.एस.सी परीक्षा फेब्रुवारी २०२४चा निकाल लागला असून शेंदुर्णी येथील स्व. शेठ राजमल लखीचंद ललवाणी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या तीनही शाखांचा उत्कृष्ट निकाल लागला आहे. विज्ञान शाखा- १०० टक्के, वाणिज्य शाखा-१०० टक्के, कला शाखा-७७.५० टक्के असा शाखानिहाय निकाल लागला आहे.
विज्ञान शाखेत ८३. १७℅ मिळवून दसरे श्रद्धा हरीश प्रथम तर कुमावत यश निरंजन ७९.६७℅ मिळवून व्दितीय आणि गवळी आरती नवल यांचा ७८.८३ मिळवून तृतीय क्रमांक आला आहे. वाणिज्य शाखेत ७४.१७℅ मिळवून द्राक्षे ज्ञानेश्वर गोकुळ प्रथम तर पाटील तरुण बाळकृष्ण ७०.३३℅ मिळवून व्दितीय आणि पाटील शुभम सुनील यांचा ६५.१७℅ मिळवून तृतीय क्रमांक आला आहे. कला शाखेत ७०℅ मिळवून होळकर निकिता तुळशीराम प्रथम तर खरे सौरव राजेंद्र ६२.१७℅ मिळवून व्दितीय आणि चौधरी जयश्री योगेश यांचा ६०.००℅ मिळवून तृतीय क्रमांक आला आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष माजी खासदार ईश्वर बाबूजी जैन, सचिव माजी आमदार मनीष जैन आणि संस्थेचे समन्वयक प्राध्यापक अतुल साबद्रा, विद्यालयाचे मुख्याध्यापक पी. टी. खलचे, उच्च माध्यमिक विभाग प्रमुख व्ही. के. वाघ यांच्यासह सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वतीने हार्दिक अभिनंदन करण्यात आले आहे.