लाडवंजारी व बंगाळे यांचा महसूल खात्यातर्फे होणार गौरव

सावदा, ता. रावेर प्रतिनिधी । महसूल दिनाच्या पार्श्‍वभूमिवर जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट कामगिरी बजावल्याबद्दल नायब तहसीलदार विकास लाडवंजारी आणि मंडळ अधिकारी जनार्दन बंगाळे यांचा सत्कार करण्यात येणार आहे.

याबाबत वृत्त असे की, ३ ऑगस्ट २०२० रोजी नाशिक विभागीय स्तरावर व्हिडीओ कॉन्फरन्सींगच्या माध्यमातून महसूल दिन साजार करण्यात येणार आहे. या पार्श्‍वभूमिवर, आज निवासी उपजिल्हाधिकारी राहूल पाटील यांनी सर्वोत्तम कामगिरी बजावणारे अधिकारी व कर्मचार्‍यांना महसूल दिनी सत्कार करण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. या यादीत सर्वोत्कृष्ट कामगिरी बजावणारे जळगाव जिल्हा कार्यालयातील नायब तहसीलदार विकास प्रल्हाद लाडवंजारी आणि मंडळ अधिकारी जनार्दन दत्तात्रय बंगाळे यांची निवड करण्यात आली आहे.

महसूल खात्याच्या विविध योजनांचे यशस्वी कार्यान्वयन आणि सेवा बजावतांना केलेली कामगिरी यांच्या बळावर या दोन्ही अधिकार्‍यांना महसूल खात्यातर्फे गौरविण्यात येणार आहे. यानिमित्त लाडवंजारी आणि बंगाळे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

<p>Protected Content</p>