धुळे प्रतिनिधी । सट्ट्याची पेढी सुरू ठेवण्यासाठी वीस हजार रूपयांची लाच स्विकारतांना धुळे येथील पोलीस हवलदारास रंगेहात पकडले. याप्रकरणी देवपूर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेली माहिती अशी की, तालुक्यातील नगाव येथील तक्रारदारास नगाव व चीचगाव येथे सट्याची पेढी सुरू करून मदत करण्यासाठी देवपूर पोलीस स्टेशनचे पोलीस हवलदार छोटू दामू बोरसे (वय-49) रा. पश्चिम देवपूर पोलीस स्टेशन, धुळे यांनी तक्ररदाराकडे दरमहा तीस हजार रूपयांची मागणी 16 सप्टेंबर रोजी केली होती. तडजोडीअंती दरमहा 20 हजार रूपये ठरविण्यात आल्यानंतर पहिला हप्ता म्हणून 15 हजार रूपयांची रक्कम आज देण्याचे होते. त्यानुसार तक्रारदार यांनी लाचलुचपत विभागात तक्रार नोंदविली. त्यानुसार आज सापळा रचून 15 हजार रूपये रोख रक्कम स्विकारतांना एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडले. याप्रकरणी देवपूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला.
यांनी केली कारवाई
पोलीस उप अधिक्षक सुनील कुराडे, पोलीस निरीक्षक मंजितसिंग चव्हाण, पोलीस निरीक्षक प्रकाश झोडगे, पोहेका जयंत साळवे, पोना संतोष हिरे, सुधीर सोनवणे, कृष्णकांत वाडीले, कैलास जोहरे, पोकॉ.प्रशांत चौधरी, भूषण खलानेकर, संदीप कदम यांनी सापळा रचून संशयित आरोपीस अटक केली.