जळगाव प्रतिनिधी । स्वस्त धान्य दुकानदाराकडून महिन्याला 500 रूपये घेणाऱ्या पुरवठा विभागाच्या अव्वल कारकूनास लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडले. याबाबत मुक्ताईनगर पोलीसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार याचे मुक्ताईनगर येथे स्वस्त धान्य दुकान असून येथील तहसिल कार्यालयातील पुरवठा विभागातील अव्वल कारकून गणेश रतन राजपूत (वय-31) रा. शिवकॉलनी, मुक्ताईनगर याने महिन्याला दुकानदाराकडून 500 रूपयांची मागणी केली होती. याप्रकरणी तक्रारदार याने अँन्टी करप्शन ब्युरोत तक्रार दाखल केली. तक्रारीनुसार मुक्ताईनगर तहसिल कार्यालयात सापळार चतन आज दुपारी 500 रूपयांची लाच स्विकारतांना अव्वल कारकून गणेश राजपूत याला रंगेहात पकडले. याबाबत लाचा स्विकारल्याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उप अधिक्षक जी.एम.ठाकुर, पोलिस निरीक्षक निलेश लोधी, पोकॉ.प्रशांत ठाकुर, पोकॉ.प्रविण पाटील, पोकॉ. नासिर देशमुख, पोकॉ.महेश सोमवंशी, पोकॉ.ईश्वर धनगर यांनी कारवाई केली.