लाच घेणाऱ्या हवालदाराला पोलीस कोठडी

Chotu

भुसावळ प्रतिनिधी । चारचाकी चालकावर हल्ला केल्याच्या प्रकरणात आरोपीला टार्चर न करण्यासह गुन्ह्यात वापरलेले वाहन सोडण्यासाठी तसेच आरोपी व तक्रारदाराच्या भावावर सरकारी कामात अडथळा न आणल्याच्या कलमाखाली कारवाई टाळण्यासाठी 40 हजारांची लाच मागणार्‍या हवलदाराला 31 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली.

भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यातील गोपनीय विभागातील हवालदार छोटू माणिकराव वैद्य (खोटे नगर, जळगाव) असे लाच घेणाऱ्या पोलीस हवलदाराचे नाव आहे. जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बुधवारी रात्री 9.45 वाजेच्या सुमारास जामनेर रोडवरील कल्पना रसवंतीजवळून लाच घेतांना संशयित आरोपी हलवदार छोटू वैद्य याला रंगेहात अटक केली. संशयीत आरोपीला दुसर्‍या दिवशी गुरुवारी भुसावळ अतिरीक्त सत्र न्यायालयात हजर केले असता न्या.एस.पी.डोरले यांनी 31 ऑगस्ट पर्यंत अशी दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

Protected Content