जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । सुप्रिम कॉलनी परिसरातून मजूराची १५ हजार रूपये किंमतीची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी मंगळवार १ नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, इम्रान शेख कमर (वय-३५) रा. पोलीस कॉलनी, सुप्रिम कॉलनी, जळगाव हा तरूण आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. मजूरी करून आपला उदरनिर्वाह करतो. इम्रान शेख याने त्याच्या घरासमोर त्याची दुचाकी (एमएच १९ डीडी ५९२०) ही पार्किंग करून लावलेली होती. ३० ऑक्टोबर रोजी रात्री १२ ते ३१ ऑक्टोबर रोजी सकाळी ५ वाजेच्या सुमारास घरसमोरून १५ हजार रूपये किंमतीची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना उघडकीला आली. त्याने दुचाकीचा सर्वत्र शोध घेतला पंरतू दुचाकी कुठेही आढळून आली नाही. अखेर मंगळवारी १ नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक विकास सातदिवे करीत आहे.