चाळीसगाव प्रतिनिधी । येथील पवार वाडी स्थित रहीवासी तसेच बीएसएनएलचे सेवानिवृत्त कर्मचारी कुंडलिक शामराव असबे (६२) यांचे नाशिक येथे खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असतांना निधन झाले आहे.
कुंडलिक असबे यांच्या पार्थिवावर दिनांक ३१ रोजी चाळीसगाव येथील खरजई रोडवरील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, ३ मुले, सुना, नातवंडे असा परीवार आहे. रिक्षा चालक प्रशांत कुंडलीक असबे यांचे ते वडील होत.