Home Cities चोपडा नाशिक विभागात चोपडा महाविद्यालयाचा कुंदन पाटील गणित विषयात सर्वप्रथम

नाशिक विभागात चोपडा महाविद्यालयाचा कुंदन पाटील गणित विषयात सर्वप्रथम

0
145


चोपडा, प्रतिनिधी । येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित कला ,शास्त्र आणि वाणिज्य महाविद्यालयाचा इयत्ता 12 वी विज्ञान वर्गाचा विद्यार्थी कुंदन रविंद्र पाटील एचएससी परीक्षेत गणित विषयात १०० पैकी १०० गुण मिळवून नाशिक विभागात गणित विषयात सर्वप्रथम आला आहे.

शेतकरी कुंटुंबातील कुंदनने संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात कनिष्ठ महाविद्यालयाच्या नावलौकिकात भर टाकली आहे. चोपडा महाविद्यालयास हा मान दुसऱ्यांदा मिळत आहे. या यशाबद्दल कुंदनचे, त्याच्या पालकांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष अड संदीप पाटील , उपाध्यक्ष आशा पाटील, सचिव स्मिता पाटील , प्राचार्य डी ए सुर्यवंशी , उपप्राचार्य प्रा. ए एल चौधरी , व्ही टी पाटील, के. एन. सोनवणे, प्रा. एन. एस. कोल्हे , ज्यु.कॉलेज उपप्राचार्य प्रा. बी. एस. हळपे , रजिष्ट्रार डी. एम. पाटील यांनी अभिनंदन केले.


Protected Content

Play sound