चाळीसगाव प्रतिनिधी । महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेमार्फत येथे आजपासून कुमार कुस्ती निवड चाचणी स्पर्धेस प्रारंभ करण्यात आला आहे.
चाळीसगाव तालुका कुमार कुस्ती निवड चाचणी स्पर्धेस सुरुवात चाळीसगाव तालुकास्तरीय कुमार गट कुस्ती निवड चाचणी स्पर्धेस आज येथील गोपाल अग्रवाल यांच्या ऑइल मिलच्या पटांगणावर सुरुवात करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेमार्फत आयोजित या स्पर्धेचे उदघाटन चाळीसगाव तालुका देखरेख संघाचे अध्यक्ष प्रदीप दादा देशमुख, जय बजरंग व्यायाम शाळेचे अध्यक्ष शिवाजी राजपूत, रघुवीर व्यायाम शाळेचे अध्यक्ष गोपाल अग्रवाल, शिवसेनेचे तालुकाप्रमुख रमेश चव्हाण, जिल्हा उपप्रमुख महेंद्र पाटील, सह्याद्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष दिलीप घोरपडे, नगरसेवक अण्णा कोळी, माजी नगरसेवक बाबा पवार व चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीचे संचालक मिलिंद देशमुख यांचे हस्ते आखाडा पुजन करून करण्यात आले.
या स्पर्धेत तालुका भरातील कुमार गटातील कुस्तीपटूंनी सहभाग घेतला असून या तालुकास्तरावरील विजयी स्पर्धकांना वरणगाव येथे दिनांक १५ डिसेंबर रोजी आयोजित जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत सहभाग घेता येणार आहे. या जिल्हास्तरीय स्पर्धेत जिल्हाभरातून आलेल्या सर्व तालुकास्तरीय विजेते पैलवान सहभागी होतील. या स्पर्धेस नगरसेवक भगवान राजपूत, बाळासाहेब वाबळे, शाम देशमुख, डॉक्टर संजय देशमुख बाळासाहेब चव्हाण, तुकाराम गवळी, प्रतापसिंह पाटील, गुलाब पैलवान, सुनील गायकवाड, भुषण पाटील, प्रमोद पाटील, रामचंद्र जाधव, शांताराम हडपे, आनंदा पवार, रावसाहेब पाटील, मंगल पवार, दीपक शुक्ला, साईनाथ देवरे, सुभाष गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते. या कुस्त्यांचे आयोजन चाळीसगाव तालुका कुस्तीगीर संघाचे वतीने अध्यक्ष सुनील बबनराव देशमुख अजय देशमुख, पी. पी. पाटील, मनोज शर्मा यांनी केले आहे.