मुंबई वृत्तसंस्था । अलिबाग येथील कुलाबा किल्ल्यावरील तोफगाड्यांची काही समाजकंटकांकडून तोडफोड झाल्याची धक्कादायक बाब बुधवारी निदर्शनास आली. या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करत दुर्ग व किल्ले संवर्धनाचे काम करणाऱ्या सह्याद्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष दिलीप घोरपडे यांनी सरकारकडे संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या आधी कुलाबा किल्ल्यावर तो गाडी बसण्यासाठी सह्याद्री प्रतिष्ठानने 31 डिसेंबर 2018 ते 7 जानेवारी 2019 दरम्यान पत्रव्यवहार केला होता. त्यानंतर 17 जानेवारीला प्रशासनाने प्रतिष्ठानला मंजुरी देत किल्ल्यावरील तीन तोफांना सागवानी लाकडी तो घडी बसविण्यास परवानगी पत्र दिले. त्यानुसार 20 जानेवारीला कुलाबा किल्ल्यावर पुरातत्त्व विभागाच्या मार्गदर्शनाने सह्याद्री प्रतिष्ठानने लोकवर्गणी करून तीन तोपंना तोडे बसले, मात्र या तीन तोफांपैकी एकाची दगडाने ठेचून तोडली केल्याची माहिती दुष्कृत्य झाल्याची प्राथमिक माहिती आले. या घटनेची माहिती मिळताच सह्याद्री प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत माहिती घेतली.
संबंधित किल्ल्यावर केंद्र पुरातत्व विभाग अंतर्गत येत असून किल्ल्यावर येणाऱ्या पर्यटकांकडून प्रत्येकी 25 रुपये तिकीट आकारले जाते. किल्ले परिसरात पुरातत्व विभागाचे अधिकारीही उपस्थित असतात. केंद्र पुरातत्व 1958 च्या कायद्याअंतर्गत वस्तूचे संरक्षण करणे ही विभागाची जबाबदारी आहे. मात्र किल्ल्यावरील वस्तूंची दगडांनी ठेचून नुकसान करण्यात आले आहे.
आंदोलनाचा इशारा
गणेश रघुवीर म्हणाले की तो गाड्यांचे डागडुजीचे काम प्रतिष्ठान करत आहे. मात्र किल्ल्यावरील कमजोर अधिकाऱ्यांच्या कमजोरीला आळा घालण्यासाठी गरज आहे. संबंधित अधिकाऱ्यांविरोधात निलंबनाची कारवाई करावी. संबंधित घटनेनंतर इतर संरक्षित स्मारक असलेल्या किल्ल्यांच्या सुरक्षेवर ही प्रश्न उपस्थित होत आहे. तसेच या घटनेचा तत्काळ सुगावा लागत प्रशासनाने दोषी अधिकाऱ्यांवर तत्काळ कारवाई केली नाही, तर राज्यभर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा सह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आलेला आहे.