चाळीसगाव प्रतिनिधी । येथील रहा अपडेट साईमतसोबत या विख्यात व्हाटसअॅप ग्रुपतर्फे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त वृक्षारोपण करून कृषी दिन साजरा करण्यात आला.
हरितक्रांतीचे प्रणेते आणि माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांची जयंती कृषी दिन म्हणून साजरा होतो. याचे औचित्य साधून रहा अपडेट दैनिक साईमत कडून शहरात वृक्षरोपण मोहित राबविण्यात येत आहे. याच्या सोबत किसान सोशल फाऊंडेशनकडून प्रति वर्षी कृषी दिन साजरा करण्यात येतो. तर ह्यावर्षी रहा अपडेट ग्रुप सोबत वृक्षारोपण मोहिमेत सहभागी होऊन किसान सोशल फाऊंडेशनने कृषी दिन साजरा केला.