पुणे येथील बालभारती संचालकपदी कृष्णकुमार पाटील

पाचोरा प्रतिनिधी । नाशिक विभागीय मंडळाचे विभागीय अध्यक्ष कृष्णकुमार पाटील यांची नुकतीच शिक्षण सहसंचालक पदावरून शिक्षण संचालक पदावर पदोन्नती करण्यात आली आहे. त्यांना संचालक, महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व संशोधन मंडळ, बालभारती, पुणे या पदावर पदोन्नती मिळाली असून त्यांनी नुकतीच पदभार स्वीकारला आहे.

कृष्णकुमार पाटील हे मूळचे पाचोरा तालुक्यातील वेरूळी येथील रहिवासी असुन ते गेल्या तीन वर्षां पेक्षा जास्त कालावधी पासून त्यांचे कडे अध्यक्ष मुंबई मंडळाचाही अतिरिक्त कार्यभार होता. कृष्णकुमार पाटील यांनी सन – २००५ मध्ये धुळे येथून जिल्हा शिक्षणाधिकारी म्हणून त्यांनी सेवेचा प्रारंभ केला. तद्नंतर शिक्षणाधिकारी ठाणे व सहसचिव नासिक बोर्ड येथे काम पाहिले. पुढे सुमारे ६ वर्ष त्यांनी राज्य मंडळ सचिव म्हणून तर काही काळ उपसंचालक, विद्या प्राधिकरण येथे सेवा बजावली असून कृष्णकुमार पाटील यांनी आपले महाविद्यालयीन शिक्षण मालेगाव, जालना, औरंगाबाद येथून पूर्ण केले आहे. पदोन्नती नंतर कृष्णकुमार पाटील यांनी सर्व वरिष्ठांसह शासनाचे आभार व्यक्त केले असून दिलेल्या जबाबदारीची जाणीव ठेवून पदाला सर्वोतोपरी न्याय देण्यासाठी कटिबंध असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. दरम्यान पदोन्नती मुळे कृष्णकुमार पाटील यांचे वेरुळी पंचक्रोशीसह पाचोरा तालुक्यासह सर्वत्र अभिनंदन होत आहे.

 

 

Protected Content