जळगाव प्रतिनिधी । शहरातील दिक्षीतवाडी परीसरात काहीही एक कारण नसतांना 18 वर्षीय तरूणावर एकाने कोयत्याने वार केल्याची घटना सकाळी 11 वाजेच्या सुमारास घडली. याबाबत जिल्हापेठ पोलीसात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शुभम राजेंद्र शिंदे (वय-18) रा. ईश्वर कॉलनी हा दिक्षीत वाडीकडे जात असतांना संशयित आरोपी सचिन उर्फ टिचकुल्या चौधरी याने येवून काहीही एक कारण नसतांना शुभमला धक्काबुक्की करत मारहाण करण्यास सुरूवात केली. त्याला विरोध केला असता सोबत आणलेला कोयत्याने त्यांच्या पायावर वार केले. शुभम शिंदे यांच्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलीसात सचिन चौधरी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोहेकॉ दिलीप सोनार करीत आहे.