कोळवद येथे पल्स पोलीओ अभियान                                           

यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील सावखेडा सिम प्राथमिक आरोग्य केन्द्राअंतर्गत येणाऱ्या कोळवद उपकेन्द्रावर प्लस पोलीओ अभियान रबविण्यात येत आहे.

तालुका वैद्यकीय आधिकारी मनीषा महाजन व प्राथमिक आरोग्य केंद्र सावखेडासिमचे वैद्यकीय अधिकारी डॉ.गौरव भोईटे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्यवर्धिनी उपकेंद्र कोळवद येथे टीम च्या माध्यमातून ० ते ५ वर्ष वयोगटातील बालकाना पोलीओ डोस पाजन्यात आला कोळवद येथील सरपंच सरपंच याकुब तडवी यांचे हस्ते मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. उपसरपंच शशिकांत चौधरी, ग्रामपंचायत सदस्य अनिल पाटील, विठ्ठल सूर्यवंशी, फत्तू तडवी आदि उपस्थित होते.

एकही बालक पोलीओ डोस पासुन वंचित राहणार नाही यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र सावखेडासिम वैद्यकीय अधिकारी डॉ.गौरव भोईटे यांच्या तर्फे नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे. मोहिमेच्या यशस्वीते साठी आरोग्यवर्धिनी उपकेंद्र येथील, सामुदाय आरोग्य अधिकारी डॉ.साजिद तडवी, आरोग्य सहाय्यक एल.जी.तडवी, आरोग्य साह्ययिक शोभा चौधरी, आरोग्यसेविका मेहमूद तडवी ,आरोग्यसेवक भुषण पाटील, आशासेविका छाया वाघुळदे, उषा कोळी, सरला गुंजाळ, अंगणवाडी सेविका जयश्री राणे, टोपलाबाई मोरे, अंगणवाडी मदतनीस रुपाली कोळी सायरा तडवी यांनी यशस्वीरित्या नियोजन केले.

Protected Content