सामूहिक विवाह सोहळ्याबाबत कोळी समाजातर्फे बैठकीचे आयोजन

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | रावेर आणि यावल तालुक्यातील कोळी समाज बांधवांची महत्त्वपूर्ण बैठक ९ मार्च रोजी सकाळी १० वाजता फैजपूर नगरपालिका सभागृह येथे आयोजित करण्यात आली आहे. ही बैठक जळगाव येथे ४ मे २०२५ रोजी होणाऱ्या संपूर्ण मोफत सामूहिक विवाह सोहळ्याच्या तयारीसाठी तसेच समाजाच्या न्याय व हक्कांसाठी लढा उभारण्याच्या नियोजनासाठी आयोजित करण्यात आली आहे.

सदर सामूहिक विवाह सोहळा दानशूर व्यक्तींच्या सहकार्याने जळगाव येथील रेल्वे स्टेशनजवळ बिग बाजार परिसरात आयोजित केला जाणार आहे. या सोहळ्यात विवाह इच्छुक कोळी समाजातील मुला-मुलींना संपूर्ण मोफत विवाह सुविधा पुरवली जाणार आहे.

बैठकीस जळगाव येथील मंडळ पदाधिकारी, मार्गदर्शक जगन्नाथ बाविस्कर (चोपडा), माजी नगराध्यक्ष चतुरभुज सोनवणे आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रभाकर सोनवणे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तसेच फैजपूर येथील खंडेराव वाडी येथील परमपूज्य महामंडलेश्वर श्री पवन दासजी महाराज (राम राज्य ग्रुप पदाधिकारी) व जळगाव येथील अन्य मान्यवर पदाधिकाऱ्यांचा कोळी समाजाच्या वतीने सत्कार करण्यात येणार आहे.

यावल आणि रावेर तालुक्यातील सर्व कोळी समाज बांधवांनी या बैठकीला उपस्थित राहावे, असे आवाहन यावल तालुका अध्यक्ष दिलीप भाऊ कोळी आणि रावेर तालुका अध्यक्ष गंभीर दादा उन्हाळे यांनी केले आहे.

Protected Content