जाणून घ्या महाराष्ट्रात झालेल्या निवडणूकीत नेत्यांनी किती प्रचारसभा घेतल्या

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | महाराष्ट्रात पाच टप्प्यात ही निवडणूक संपन्न होत असून पहिल्या चार टप्प्यात मतदानही झाले आहे. तर, सोमवारी शेवटच्या 20 मे रोजी मुंबईसह उपनगर व पालघर, नाशिक, धुळे अशा एकूण १३ मतदारसंघात मतदान होत आहे. शनिवारी सायंकाळी सहा वाजता सर्व शेवटच्या टप्प्यांतील प्रचारांची सांगता झाली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून सर्वच राजकीय दिग्गज या निवडणुकांसाठीच्या प्रचारात व्यस्त होते. या प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदींचे महाराष्ट्रात सर्वाधिक येणे झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गतवर्षीच्या तुलनेत यंदा महाराष्ट्रात दीडपट सभा घेतल्या आहेत. मोदींनी महयुतीसाठी महाराष्ट्रात निवडणुकांसाठीची सर्वाधिक 18 सभा घेतल्या. मोदीनंतर अमित शाह यांनी सात सभांसह महाराष्ट्रात दुसऱ्यास्थानी आहेत. सर्वच नेत्यांनी प्रचारसभा, कॉर्नरसभा, रोड शो आणि रॅलींच्या माध्यमातून यंदाच्या निवडणुकीत कंबर कसली होती.

महाविकास आघाडीसाठी महाराष्ट्रात काँग्रेससह आपच्या राष्ट्रीय नेत्यांनी सभा घेतल्या. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी दोन सभा घेतल्या आहेत. राहुल गांधी व प्रियंका गांधींनीही महाराष्ट्रात दोन जाहीर सभा घेतल्या आहेत. राहुल गांधींनी सोलापूर व पुणे येथील उमेदवारांच्या प्रचारार्थ जाहीर सभा घेतल्या आहेत. आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनीही एक सभा घेतली.

महाराष्ट्रात सर्वाधिक सभा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतल्या आहेत. फडणवीसांनी तब्बल 115 सभा घेतल्या. नाना पटोले यांनीही शंभर पेक्षा जास्त सभा घेतल्या पार केले आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पंक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी 60 पेक्षा जास्त सभा घेतल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी 48 सभा घेत प्रचार केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी 30 पेक्षा जास्त सभा घेतल्या. तर, मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ 4 सभा घेतल्या.

Protected Content