जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चाकूचा धाक दाखवित चोरी करणार्या संशयित आरोपीला धुळे जिल्ह्यातून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. याबाबत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
एकनाथ उर्फ एका उर्फ योगेश चिंतामण जाधव रा. नंदाणे ता.जि. धुळे ह. मु. सुरत असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, अमळनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीत चाकूचा धाक दाखवून एकनाथ उर्फ एका एर्फ योगेश जाधव याने लुटल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, गुन्हा दाखल झाल्यापासून योगेश हा फरार होता. दरम्यान, तो त्याच्या मूळ गावी धुळे जिल्ह्यातील नंदणे येथे आल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना मिळाली. त्यांनी पोहेकॉ संदीप पाटील, पोना प्रवीण मांडोळे, राजेंद्र पवार यांचे पथक रवाना केले. यापथकाने नंदणे येथून एकनाथ उर्ङ्ग योगेशच्या मुसक्या आवळल्या. त्याला पुढील कार्यवाहीसाठी अमळनेर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.