जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांची बदली; ढाकणे यांची नियुक्ती

जळगाव प्रतिनिधी । जळगावचे जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांचीदेखील आज बदली झाली असून त्यांच्या जागी सोलापूरचे आयुक्त अविनाश ढाकणे यांची नियुक्ती झाली आहे.

महापालिका आयुक्त चंद्रकांत डांगे यांच्यासोबत जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांचीदेखील बदली होणार असल्याची चर्चा होती. या अनुषंगाने आयुक्त चंद्रकांत डांगे यांच्या बदलीनंतर काही तासांमध्येच किशोरराजे निंबाळकर यांचीदेखील बदली झाल्याचे वृत्त आहे. किशोरराजे निंबाळकर यांनी जिल्ह्यात चांगली लोकप्रियता संपादन केली होती. प्रशासनाला मानवी चेहरा प्रदान करण्याचे काम त्यांनी केले होते. जळगाव महापालिकेच्या आयुक्तपदाचा अतिरिक्त कार्यभार असतांनादेखील त्यांनी जनतेची मने जिंकली होती. दरम्यान, किशोरराजे निंबाळकर यांच्या नियुक्तीचे नेमके ठिकाण व पद समजले नसले तरी त्यांच्या जागी सोलापूर महापालिकेचे आयुक्त अविनाश ढाकणे यांची नियुक्त झाली आहे.

One Response

  1. Bhavik Saraviaya

Add Comment

Protected Content