Home Cities जळगाव किसनराव नजन पाटीलच एलसीबीचे ‘कारभारी’

किसनराव नजन पाटीलच एलसीबीचे ‘कारभारी’

0
45

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | स्थानिक गुन्हा शाखेची धुरा पुन्हा एकदा पाचोरा येथील पोलीस निरिक्षक किसनराव नजन पाटील यांच्याकडे आली आहे.

 

एलसीबीचे प्रमुख किरणकुमार बकाले यांनी मराठा समाजाबाबत केलेल्या आक्षेपार्ह टिपण्णीमुळे त्यांना निलंबीत करण्यात आले आहे. यानंतर अनेक घडामोडी घडून एलसीबीचे प्रमुख पद नेमके कुणाकडे राहील याबाबत संभ्रमाचे वातावरण पसरले होते. मात्र या पदावर पुन्हा एकदा पाचोरा येथील पोलीस निरिक्षक किसनराव नजन पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. अर्थात, किसनराव नजन पाटील हे आता एलसीबीचे प्रमुख बनणार असल्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.


Protected Content

Play sound