किसान सन्मान योजनेसाठी रावेर तालुक्यातून ३२ हजार शेतकरी पात्र

रावेर प्रतिनिधी । प्रधानमंत्री किसान सन्मान निधी या महत्वपूर्ण योजनेत तालुक्यातील ४८ हजार खातेदारांपैकी ३२ हजार खातेदार पात्र ठरले असल्याची माहिती तहसीलदार विजयकुमार ढगे यांनी दिली

येथील तहसील कार्यालयात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी या योजनेचा शुभारंभ आज करण्यात आला. यावेळी कृषी अधिकारी सुधाकर पवार यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले की, शेतकर्‍यांना या योजनेचा लाभ मिळण्यासाठी महसूल, कृषी विभाग व ग्रामसेवक रात्रंदिवस काम करीत होते. यावेळी प्रतिकात्मक स्वरुपात या योजनेत पात्र असलेले रामकृष्ण महाजन, नारायण मिस्तरी, गुलाब सवर्णी, रामदास पाटील, गोपाळ धनगर, मधुकर पाटील यांच्यासह योजनेत पात्र शेतकर्‍यांचा तहसीलदार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी अध्यक्षस्थानी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन, नायब तहसीलदार कविता देशमुख, शहरध्यक्ष मनोज श्रावग, आदी उपस्थित होते. यावेळी किसान सन्मान निधी वितरणाचा उत्तर प्रदेशच्या गोरखपुर येथून पंतप्रधान यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला, यावेळी त्यांनी केलेले मार्गदर्शन उपस्थित शेतकर्‍यांनी थेट ऐकले.

Add Comment

Protected Content