पाचोरा प्रतिनिधी । पशु वैद्यकीय दवाखाना श्रेणी – २ लोहटार कार्यक्षेत्रातील अंतुर्ली बु” ता. पाचोरा येथे विठ्ठल दूध संकलन केंद्र यांच्या सौजन्याने व पशुसंवर्धन विभाग पंचायत समिती, पाचोरा यांच्या विद्यमाने किसान क्रेडिट कार्ड मार्गदर्शन शिबिर व अस्कॅड अंतर्गत चर्चासत्र संपन्न झाले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पाचोरा पंचायत समितीचे माजी सभापती तथा पंचायत समिती सदस्य सुभाष पाटील हे होते. कार्यक्रमाचे उद्घाटन गावाचे सरपंच तुळसाबाई पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
चर्चासत्रामध्ये डॉ. अशोक महाजन यांनी जनावरांमध्ये विविध आजार उपचार व घरगुती उपाय बाबत मार्गदर्शन केले. निलेश बारी यांनी आधुनिक पशुपालन कसे करावे याबाबत माहिती सांगितली. तर डॉ. संदीप पाटील यांनी पशुसंवर्धन विभागाच्या योजना व किसान क्रेडिट कार्ड बाबत सविस्तर मार्गदर्शन केले. राहुल हेडा मॅनेजर कारगिल यांनी दुधाळ जनावरांची निवड कशी करावी व जनावरांचा आहार याबद्दल सविस्तर माहिती देऊन मार्गदर्शन केले. प्रदीप मराठे पोखरा योजना संयोजक यांनी पोखरा विषयी माहिती दिली.
उपस्थित पदाधिकाऱ्यांच्या हस्ते अनुवंशिक सुधारणा योजनेचे लाभार्थी तुळशीराम भालचंद्र तुळशीराम पाटील, रमेश चौधरी, दशरथ पंडित लोहार (लोहटार), विजय सोनगिरे (नेरी) या चार लाभार्थ्यांना ५ हजार रुपये मानधनाचे धनादेश वाटप करण्यात आले. यावेळी उपसरपंच प्रदीप पाटील, विजय पाटील, अध्यक्ष विठ्ठल दूध संकलन केंद्र भूषण पाटील, मनोज पाटील, रवी पाटील ग्रामपंचायत सदस्य, पशुसंवर्धन विभागातील अधिकारी कर्मचारी व गावातील पदाधिकारी ग्रामस्थ उपस्थित होते. चर्चासत्र नंतर वंधत्व निवारण शिबिर घेऊन गावातील माजावर न येणाऱ्या वारंवार उलटणार्या गाई – म्हशींची तपासणी करण्यात आली. सदरची तपासणी डॉ. अशोक महाजन, डॉ. निलेश बारी, डॉ. वानखेडे, डॉ. चारुशीला पाटील, डॉ. नारखेडे, डॉ. संदीप पाटील (खाजगी पशुवैद्य), डॉ. संदीप पाटील (बांबरुड), डॉ. कुणाल पाटील (वरसाडे), समाधान पाटील, दिपक पाटील, शुभम पाटील, संजय पाटील, किशोर पाटील, अरविंद पाटील यांनी केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लोहटार पशुवैद्यकीय दवाखान्याचे डॉ. संदिप पाटील यांनी केले.