चोपडा (प्रतिनिधी) आजचा युवक आधुनिक युगात भटकत आहे. प्रत्येक देवस्थान त्याला पर्यटन स्थळ आणि मौज-मस्ती करण्यासाठीच आहे, असे वाटतेय. दुसरीकडे कीर्तन सप्ताह फार कमी गावांमध्ये होत आहे. कारण कीर्तनाला मनोरंजनाचे साधन समजत चालले आहे. परंतू हे मनोरंजन नसून मनशांती साठी आहे, असे प्रबोधन ह.भ. प.भावेश महाराज (विटनेर ) यांनी केले. ते चोपडा येथे मांडले श्री संत शिरोमणी सावता महाराज पुण्यतिथी निमित्त श्री फुलमाळी समाज सुधारणा पंच मंडळ तसेच सर्व समाज बांधव यांच्या वतीने अखंड हरिनाम सप्ताहात चौथे पुष्प गुंफताना बोलत होते.
ह.भ.प.भावेश महाराज पुढे म्हणाले की, अन्न, धन, मान , संपत्तीं या सर्व गोष्टी प्रारब्धाने मिळत असतात. परंतू ज्ञान हे आपल्या महेनतीने मिळत असते. देवाची सेवा करत असताना सद्सदविवेकबुद्धीने विचार केला. तर सेवा अवघ्या पाच ते दहा मिनिटांची करतात आणि देवाकडून मागतांना मनभर मागतात. यावेळी समाजातील लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी समाजातर्फे अनेक देणगीदार ,कार्यक्रम यशस्वीतेसाठी अनेकांचे हातभार लागले. अशा अनेक मान्यवरांचा टॉवेल, शाल, श्रीफळ, गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. बापू टी हाऊसचे संचालक पितांबर महाजन यांचा पाच दिवशीय सप्ताहा करण्यासाठी सर्वात मोठा सहभाग आहे. त्यासाठी त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच पत्रकार लतीश जैन , हेमंत वाणी यांच्याही विषेश सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सी.बी.माळी यांनी केले.