होय…मलिकांच्या घरी ‘सरकारी पाहुणे’ नक्की जाणार ! : सोमय्या

मुंबई प्रतिनिधी | ”नवाब मलीक यांनी वक्फ बोर्डाच्या जमीनी हडप केल्या असल्याने त्यांच्या घरी ‘सरकारी पाहुणे’ नक्की जाणार !” असे ट्विट भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केले आहे. यातून त्यांनी मलिक यांच्याच शब्दात त्यांना उत्तर दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

राज्याचे अल्पसंख्यांक खात्याचे मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी आज सकाळी एक सूचक ट्विट केले. आपल्या ट्वीटमध्ये मलिक म्हणतात, ”साथियों, सुना है, मेरे घर आज-कल मे सरकारी मेहमान आने वाले है, हम उनका स्वागत करते है. डरना मतलब रोज रोज मरना, हमे डरना नहीं, लड़ना है, गांधी लड़े थे गोरों से, हम लड़ेंगे चोरों से” असे मलिक यांनी या ट्वीटमध्ये म्हटले आहे.

यानंतर किरीट सोमय्या यांनी ट्विट केले. यात मंत्री नवाब मलिकांनी वक्फ बोर्डाच्या जमिनी ढापल्या आहेत. हा घोटाळा बाहेर आलाय म्हणूनच ते हात-पाय मारत आहेत. त्यांच्या घरी सरकारी पाहुणे नक्की जाणार, असा दावा त्यांनी केला आहे. यात त्यांनी पुढे म्हटले आहे की, मलिक हे आत्ता ट्वीट करतात. कारण त्यांना भीती वाटतेय. पुण्यात नवाब मलिक यांनी वक्फ बोर्डात घोटाळा केला आहे. ही जमीन नातेवाईकांच्या नावे केली आहे. जमिनी ढापल्या आहेत. त्यामुळेच नवाब मलिक यांना भीती वाटत आहे. आता घोटाळेबाजांची चौकशी होणार आणि चोरीचा माल जप्त होणार. घोटाळा बाहेर आलाय म्हणून मलिक हात पाय मारत आहेत. पैसे देऊन, प्रेशर करून घोटाळा लपत नाही. चोरी केली तर शिक्षा होणारच, असा दावाही सोमय्यांनी केला.

Protected Content