मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | ठाकरे सरकारमधील डर्टी डझनवर कारवाई होणारच असा पुनरूच्चार करत भाजपचे ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या आज दापोलीकडे रवाना झाले. याप्रसंगी त्यांनी हातात भला मोठा हातोडा दाखवून आपले मनसुबे जाहीर केले आहेत.
भाजप नेते किरीट सोमय्या आज कोकणातील दापोली येथे जाण्यासाठी मुंबईहून रवाना झाले आहेत. याप्रसंगी प्रसारमाध्यमांशी बोलतांना त्यांनी मविआ सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. दापोली कडे निघण्यापूर्वी सोमय्या यांनी एक प्रतिकात्मक मोठा हातोडा प्रसारमाध्यांसमोर दाखवला. हा हातोडा जनतेच्या भावनेचं प्रतिक असल्याचे सोमय्या यांनी म्हटले आहे. जनता असाच हातोडा घेऊन यांना बाहेर घालवणार आहे. साडेबारा कोटी जनतेचा हा हातोडा असल्याचे सोमय्या म्हणाले.
मंत्री अनिल परब यांचे रिसॉर्ट बेकायदेशीर असल्याचा आरोप याआधीच किरीट सोमय्या यांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर सोमय्या यांनी आज दापोली येथे जाण्याचा निर्णय घेतला आहे. याआधी मिलींद नार्वेकरांचा बंगला तोडला आता अनिल परब यांचा रिसॉर्ट तोडूयात असेही ते म्हणालेत. आम्ही जनतेची भाषा बोलतो. जनतेची ताकद दाखवायला मी दोपीलाला जात आहे. हा साडेबारा जनतेचा सत्याचा आग्रह असल्याचे सोमय्या म्हणाले. अनिल परबला आज ना उद्या काढावचं लागणार असल्याचे सोमय्या म्हणाले. हा हातोडा ठाकरे सरकारमधील जे लघोटाळेबाज, अनाधिकृत बांधकाम, वसुलीचा पैसा घेतायेत त्या माफियांच्या विरोधात असल्याचे सोमय्या म्हणाले. दरम्यान, मला अटक करुन दाखवा असे आव्हान देखील सोमय्या यांनी दिले आहे. उद्धव ठाकरेंचं चाललं असतं तर माझे हात पाय कधीच तोडले असते, मात्र मला सुरक्षा आहे म्हणून वाचलो असेही ते म्हणाले.