चंदीगड वृत्तसंस्था । आयपीएलमधील किंग्ज इलेव्हन पंजाब संघाने पुलवामा हल्ल्यातील शहीदांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत केली आहे. फेब्रुवारी महिन्यात पुलवामात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचे ४० जवान शहीद झाले होते. त्यातील पाच जवानांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाख रूपयांची आर्थीक मदत देण्याचे जाहिर केले आहे. पाचही शहीद जवान हे पंजाब-हिमाचलमधील होते. किंग्ज इलेव्हन पंजाब टीमचा कर्णधार रविश्चंद्र अश्विन आणि सीआरपीएफ उपमहानिरीक्षक व्ही. के. कौंदल यांच्या उपस्थितीत ही आर्थिक मदत देण्यात आली.
शहीद सीआरपीएफ जयमल सिंग, सुखजिंदर सिंग, मनिंदर सिंग, कुलविंदर सिंग आणि तिलक राज यांच्या कुटुंबांच्या सदस्यांकडे त्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाखांची मदत देण्यात आली. जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या या हल्ल्यामुळे देशभरात संतप्त प्रतिक्रिया उमटली. या हल्ल्यातील शहीद सीआरपीएफ जवानांच्या कुटुंबीयांना देशभरातून आर्थिक मदत मिळाली.