किनगाव ग्रामपंचायतीने कर्मचाऱ्यांच्या पगारात केली वाढ

 

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील किनगाव येथील ग्राम पंचायत कर्मचाऱ्यांना न्याय मिळाला असून कर्मचाऱ्यांच्या पगारात २ हजार ते ६ हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे. पंचायत राज्याच्या स्थापनेमागील उद्देश तडीस नेला, असे मत महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाचे सहसचिव अमृत महाजन यांनी मांडले

यावेळी मावळत्या ग्रामपंचायत कार्यकारी मंडळाच्या सत्कार करण्यात आला. किनगाव ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांच्या पगारात २ हजार ते ६ हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे. ही वाढ जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या जीवनातील अत्यंत मोलाची असून यामुळे कर्मचाऱ्यांचे जीवनमान निश्चित उंचावणार आहे. पंचायत राज आणणे मागील उद्देश खऱ्या अर्थाने कर्मचाऱ्यांना न्याय देऊन किनगाव बु! ग्राम पंचायतीने तडीस नेला आहे, असे प्रतिपादन ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाचे सहसचिव अमृत महाजन यांनी किनगाव बु! ग्रामपंचायतीच्या सरपंच उपसरपंच व सर्व सन्माननीय पदाधिकारी यांच्या सत्कार व निरोप प्रसंगी बोलताना केले.

यावेळी ग्रामपंचायत कर्मचारी महासंघातर्फे सरपंच टिकाराम चौधरी, उपसरपंच लतिफ तडवी, सर्व सन्माननीय सभासद व ग्राम विकास अधिकारी प्रदीप धनगर यांनी त्यांच्या कार्यकाळाचा शेवटच्या कालावधीत गावातील १५ ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे पगार किमान वेतन कायद्याप्रमाणे व राहणीमान भत्ता ४०५० रुपये लावून वाढ केली. तसेच कर्मचाऱ्यांचे १९९९ पासून जे कपात प्रोविडेंट फंड बँक खाते भरणा न झाल्याने प्रलंबित भरणा करण्याची ग्वाही दिली. कर्मचाऱ्यांनी यांच्या सत्कार बरोबर निरोप समारंभाचा कार्यक्रम किनगाव ग्रामपंचायत सभागृहात आयोजित केला होता. तसेच गावातील जेष्ठ निष्ठावान कम्युनिस्ट कार्यकर्ते एकनाथ महाजन यांच्याही शाल श्रीफळ गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाचे तालुकाध्यक्ष कॉम्रेड किशोर कंडारे हे होते. या सर्व मान्यवरांचा सत्कार महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाचे सचिव कॉम्रेड अमृत महाजन यांनी व सहकाऱ्यांनी केला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदिप जोशी यांनी केले.

संचालक कार्यकारी मंडळाच्या वतीने आभार व्यक्त करताना ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी प्रदीप धनगर म्हणाले की, किनगाव ग्रामस्थांकडे तीन कोटी रुपये कर थकबाकी असून वसुलीसाठी ग्रामस्थांचा प्रतिसाद वाखाणण्याजोगा आहे. विशेष कोरोना महामारी असतांनाच प्रतिसाद असाच राहिला तर गावाचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही, अशी ग्वाही दिली किशोर कंडारे यांनी अध्यक्षीय भाषणात त्यांच्या  कर्मचारी पदाच्या काळात माजी सरपंच कै. शामराव कोळी महमूद बोंदर व ग्राम विकास अधिकारी नाले यांचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख केला व आभार मानले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिपाई छगन साळुंखे, संदीप राजू पाटील, सुरेश साळुंखे, नाना पाटील ,जगदीश कंडारे,  गौतम कंडारे संदीप रोहिदास पाटील, डाटा ऑपरेटर सुजाता डाके ,बेबाबाई कंडारे शांताबाई कंडारे रंजीता रल, ज्योती जावा, राजू जावा, आरती कंडारे, बेबाबाई कंडारे, दिनकर सुतार, निलेश धांडे इ.परीश्रम घेतले तसेच अकुल खेडे येथील प्रकाश रल सुमनबाई रल हे यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.

 

Protected Content