विघ्नहर्ता हॉस्पिटलमध्ये रविवारी किडनीतज्ञ डॉ. जाधव करणार उपचार

c4504823 fb5a 43af bc7a 04d017771a80

पाचोरा, प्रतिनिधी | येथील विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये रविवारी (दि.४ऑगस्ट) किडनी विकार व प्रत्यारोपणतज्ञ डॉ. स्वप्निल जाधव रूग्णांवर उपचार करण्यासाठी उपलब्ध असतील.

 

किडनी हा अवयव मानवी शरीरातला एक महत्वाचा अवयव असून त्याचे कार्य सुरळीत चालणे, अत्यंत गरजेचे असते. आपल्या शरीरात दोन किडन्या असतात. त्या एकप्रकारे फिल्टरसारखे काम करून शरीर शुद्धीकरण करीत असतात.

किडन्या व्यवस्थित काम करीत नसतील तर त्याची लक्षणे लगेच दिसून येतात. जसे की, सकाळी झोपेतून उठल्यावर डोळ्यांवर सूज असणे, चेहरा आणि पायावर सूज येणे, भूक कमी होणे, मळमळ व उलट्या होणे, लघवीच्या वेळी जळजळ होणे, लघवीतून रक्त अथवा पू येणे, रात्री वारंवार लघवी लागणे, लघवी गडद रंगाची होणे, लघवी करताना जोर द्यावा लागणे व सुरु होण्यास वेळ लागणे, लघवीमध्ये फेस येणे, लघवीचे प्रमाण कमी होणे, मूत खड्याचा त्रास होणे, थकवा जाणवणे, रक्तातील पोषक घटक कमी होणे व लहान वयात उच्च रक्तदाबाचा त्रास होणे आदी कारणांवरून किडन्यांचे कार्य नीट होत नसल्याचे निदर्शनास येते, तरी अशी लक्षणे दिसून येणाऱ्या रुग्णांनी अवश्य डॉ. जाधव यांच्याकडून उपचार करून घेण्याच्या सुविधेचा अवश्य लाभ घ्यावा, असे हॉस्पिटल प्रशासनाने कळवले आहे.

Protected Content