

जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील एका गावात राहणारी १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची धक्कादायक घटना बुधवारी १० डिसेंबर रोजी मध्यरात्री २ वाजता समोर आली. याबाबत सायंकाळी ६ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
जळगाव तालुक्यातील एका गावात १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. ९ डिसेंबर रोजी रात्री ९ वाजता पिडीत मुलगी ही आपल्या कुटुंबासह झोपलेली होती. दरम्यान मध्यरात्री अज्ञात व्यक्तीने तिला काहीतरी आमिष दाखवून फूस लावून पळवून नेले. हा प्रकार मध्यरात्री २ वाजता समोर आला. त्यामुळे तिच्या नातेवाईकांनी तिचा सर्वत्र शोध घेतला परंतू कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर त्यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून याबाबत तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संजय पाटील हे करीत आहे.



