मामाकडे असलेल्या अल्पवयीन मुलीचे अपहरण

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ तालुक्यातील एका गावात मामाकडे असलेल्या मलकापूर येथील १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची घटना रविवार १६ जून रोजी पहाटे ३ वाजेच्या सुमारास समोर आले आहे. याप्रकरणी दुपारी १२ वाजता भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर येथील १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. काही दिवसांपुर्वीच मुलगी ही भुसावळ तालुक्यातील मामाकडे आलेली होती. दरम्यान, रविवारी १६ जून रोजी पहाटे ३ वाजेच्या सुमारास अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने काहीतरी आमिष दाखवत फूस लावून पळवून नेले. ही घटना नातेवाईकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी मुलीचा सर्वत्र शोध घेतला परंतू कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर तिचे मामा यांनी दुपारी १२ वाजता भुसावळ तालुका पोलीसात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ युनूस शेख हे करीत आहे.

Protected Content