Home क्राईम जळगावातून अल्पवयीन मुलीचे अपहरण; गुन्हा दाखल

जळगावातून अल्पवयीन मुलीचे अपहरण; गुन्हा दाखल


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरात गुन्हेगारीच्या घटनांसोबतच बेपत्ता होण्याच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. रामानंद नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एक १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी अज्ञात इसमाविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील एका भागात राहणारी पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलगी ही ९ मार्च रोजी सकाळपासून बेपत्ता झाली आहे. तिच्या नातेवाईकांनी तिचा सर्वत्र शोध घेतला परंतू कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर तिच्या पालकांनी रामानंद नगर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस कर्मचारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील हे करीत आहे.


Protected Content

Play sound