Home Uncategorized अल्पवयीन मुलीचे अपहरण; अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा !

अल्पवयीन मुलीचे अपहरण; अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा !


अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर शहरातील एका भागात राहणाऱ्या एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने आमिष दाखवून पळवून नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ९ ऑगस्ट रोजी दुपारी दीड वाजता ही घटना घडली असून, या प्रकरणी मंगळवारी, १२ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अमळनेर शहरातील १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी ९ ऑगस्ट रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घरी होती. त्याचवेळी एका अज्ञात व्यक्तीने तिला काहीतरी आमिष दाखवले आणि फूस लावून पळवून नेले.

मुलगी घरी दिसली नाही म्हणून तिच्या नातेवाईकांनी तिचा सर्वत्र शोध घेतला. परंतु, ती कुठेच न आढळल्याने त्यांनी तातडीने अमळनेर पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि घडलेला प्रकार पोलिसांनासांगितला. त्यांच्या तक्रारीवरून, अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे अमळनेर शहरात खळबळ उडाली असून, अल्पवयीन मुला-मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पालकवर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल विनोद सोनवणे करत आहेत.


Protected Content

Play sound