जळगाव -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील रामेश्वर कॉलनीतील १७ वर्षीय अल्पवयीन मुलाचे अपहरण केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी सोमवार, ८ ऑगस्ट रोजी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
जळगाव शहरातील रामेश्वर कॉलनी येथील वय १७ मुलगा हा त्याच्या घरी असतांना त्यास ७ ऑगस्ट ते ८ ऑगस्ट दरम्यान अज्ञात व्यक्तीने काहीतरी फूस लावून पळवून नेले. मुलगा उशीर होवून पुन्हा घरी न परतल्याने त्यांच्या कुटुंबियांनी शोध घेतला मात्र तो मिळून आला नाही. अखेर एमआयडीसी पोलिसात तक्रार दिली. या तक्रारीवर अज्ञात व्यक्तीविरोधात एमआयडीसी पोलिसात अपहरणाचा गुन्हा दाखल झाला आहे.