जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील एका गावात राहणारी १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत एमआयडीसी पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील एका गावात १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. १६ फेब्रुवारी रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास गावातील संशयित आरोपी भैय्या अवचित पवार याने १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी घरी एकटी असतांना फूस लावून पळवून नेले आहे. नातेवाईक घरी आल्यावर मुलगी कुठेही दिसून आली नाही. त्यांनी नातेवाईका व इतर ठिकाणी शोधशोध केली परंतू कुठेही मिळून आली नाही. अखेर त्यांनी सोमवार २१ फेब्रुवारी रोजी दुपारी 2 वाजता एमआयडीसी पोलिस ठाण्यात धाव घेऊन संशयित आरोपी भैय्या अवचित पवार याच्या विरोधात तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अनिंस शेख करीत आहे.