खिरवड येथील जि.प. शाळेची लोखंडी जाळीचे नुकसान; एकावर गुन्हा

रावेर प्रतिनिधी । तालुक्यातील खिरवळ येथील जिल्हा परिषद शाळेला लावण्यात आलेली संरक्षण लोखंडी जाळीचे नुकसान केल्याप्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, रावेर तालुक्यातील खिरवळ येथील जिल्हा परिषद केंद्र शाळाच्या इमारतीला संरक्षणासाठी लोखंडी तार कंपाऊंड केलेले आहे. संशयित आरोपी शफी शकील शेख याने इमारतीच्या नेटचे जाळे तोडून त्याठिकाणा वरुन खासगी वापरासाठी गेट तयार केले. जिल्हा परिषद शाळेचे सार्वजनिक मालमत्तेची ४ ते ५ हजाराचे नुकसान केल्याचा प्रकार आज सकाळी उघडकीस आला आहे.  याबाबत रावेर पोलिस ठाण्यात संशयित आरोपी शफी शेख याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ अर्जुन सोनवणे करीत आहेत.

 

 

Protected Content