लोहारा येथील अर्जुन भोई यांना खान्देशभूषण पुरस्कार जाहीर

पाचोरा प्रतिनिधी । सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रात आपले योगदान दिलेले, देत असलेले तालुक्यातील लोहारा येथील अर्जुन रामचंद्र भोई यांना राजनंदिनी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, जळगांव यांच्या माध्यमातून संस्थेचा सर्वोच्च सन्मान “खान्देश भूषण पुरस्कार” जाहीर झाला आहे.

 

हा पुरस्कार जळगाव येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील अल्पबचत भवनात ५ डिसेंबर २०२१ रोजी पुरस्कार देवून सन्मानित करण्यात येणार आहे. लोहारासुपुत्र अर्जुन भोई यांनी आपल्याला अनेक पातळ्यांवर आपल्या सेवाभावी कार्यातून स्वतः ला सिध्द केले आहे. खान्देशभूषण या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात येत असल्यामुळे लोहारा परिसरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. आजपर्यंत त्यांना अनेक मान सन्मानाने राज्यात व राज्याबाहेर ही सन्मानित करण्यात आले आहे. त्यात विशेष म्हणजे भिवंडी येथे “बारा बलुतेदारांचा महाराष्ट्र समाज भूषण”, पुणे येथे “राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार”, पुणे येथे “मल्लाव समाज सन्मान”, नागपूर येथे “समाज मित्र”, भोई गौरव सन्मान, नवी दिल्ली येथे “समाज साथी”, धुळे येथे “भोई समाज भूषण”, मध्यप्रदेश शिवपुरी येथे “समाज साथी” अशा दशकाच्या पटीतील अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. अर्जुन भोई यांच्या या अतुलनीय कामगिरीबद्दल त्यांचे लोहारा सह परिसरातून अभिनंदन व कौतुक केले जात आहे.

 

Protected Content