भडगाव प्रतिनिधी | येथिल बाजार चौकातील खंडेराव महाराज यात्रोत्सवात हजारो भाविकांनी चंपाषष्ठी निमित्ताने भरीत भाकरीचा अस्वाद घेतला.
मध्यवर्ती शहर बाजार चौकात पुरातन खंडेराव महाराज मंदीर असुन खंडेराव महाराज काकणबर्डी येथे जाताना भडगाव मुक्कामी होते असा पुरातन इतिहास आहे. चंपाषष्टी निमित्ताने खंडेराव मंदीरात सालाबादाप्रमाणे खंडेराव यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी खंडेराव महाराज मुर्तीचे सामाजिक कार्यकर्ते विजय चौधरी यांच्या हस्ते विधीवत पुजन करण्यात आले.
यावेळी नगरपरीषद मुख्यधिकारी रविंद्र लाडे, माजी नगराध्यक्ष सुनिल देशमुख, डाॕ. प्रमोद पाटील, डाॕ. विजयकुमार देशमुख, विहीपचे नाना हडपे, बजरंग दलाचे मिलिद बोरसे, भाजपाचे सोमनाथ पाटील, जगन भोई, सचिन चोरडीया, शंकर मारवाडी, महेद्र ततार, प्रदिप महाजन, संतोष महाजन, राजेद्र देशमुख यांनी यात्रा निमित्ताने खंडेराव महाराज यांचे दर्शन घेतले.
दरवर्षी खंडेराव महाराज यात्रा उत्सव निमित्ताने भरीत व भाकरी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यात सुमारे चार ते पाच हजार भाविकानी भरीत भाकरीचा अस्वाद घेतला.
महाप्रसादचा लाभ घेण्यासाठी भडगाव पंचक्रोषीतुन भाविक, नागरीक मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. भाविकांनी भरीत भाकरीचा मनमुराद अस्वाद घेतला. सायंकाळी शहरातील पाच जोडप्याच्या हस्ते दिवटी पुजन करुन दिवटी मिरवणुक काढण्यात आली. तर रात्री शाहीर परशुराम याचा वाघ्यामुरळी (गोधळ) कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे.
यशस्वीतेसाठी आबा चौधरी, ईश्वर वाणी, दिपक वजीरे, संदीप धोबी, भागवत कुंभार, प्रकाश चौधरी, महेश चोधरी सह यात्रा उत्सव पंच कमेटीचे सर्व पदाधिकारीसह कार्यकर्ते यांनी परीश्रम घेतले.