यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | यावल तालुक्यातील दहीगावात उद्या दिनांक ३ मार्च रोजी खंडेराव महाराजांचा यात्रा उत्सव साजरा करण्यात येणार असुन या निमित्ताने पारंपारीक पध्दतीने बारागाड्या ओढण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. दहिगाव तालुका यावल येथील हिंदूं समाज बांधवांचे कुलदैवत खंडेराव महाराज यांच्या यात्रेचा निमित्ताने उद्या रविवारी ३ मार्च रोजी बारागाड्या ओढण्याचा कार्यक्रम व गोंधळ जागरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तरी यात्रोत्सवाचा लाभ परिसरातील भाविकांनी घ्यावा असे आवाहन आयोजक ग्रामस्यांच्या वतीने करण्यात आले आहे.
या यात्रा उत्सवाच्या निमित्ताने सकाळी आठ वाजता गावा परिसरातील सर्व देवतांची पूजा करण्यात येणार आहे सायंकाळी सहा वाजेच्या दरम्यान सावखेडासिम रस्त्यावरील पिर बाबा यांच्या दर्गापासुन बारागाड्या ओढण्यास सुरुवात करण्यात येऊन त्याची सांगता खंडेराव महाराजांच्या मंदिराजवळ होणार आहे. रात्री नऊ वाजता गोंधळ जागरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. खंडेराव महाराजांच्या दर्शनाचा लाभ घ्यावा व यात्रोत्सवात सहभागी व्हावे असे आवाहन पंच कमिटी दहिगाव यांनी केले आहे
दहिगाव येथे ३ मार्च रोजी खंडेराव महाराज यात्रा व बारागाडया ओढण्याचा कार्यक्रम
11 months ago
No Comments