खामगाव प्रतिनिधी । सरत्या वर्षाला निरोप व नविन वर्षाचे स्वागत मोठ्या उत्साहात केले जाते. याच पार्श्वभुमीवर थर्टीफर्स्टचे जंगी स्वागत करण्यासाठी रस्त्यावर होणारी अलोट गर्दी आणि कायद्या व सुस्वस्थेला आळा बसावा, यासाठी खामगाव पोलिसांकडून विशेष मोहीम आज राबविण्यात येत आहे.
आज दि.31 डिसेंबर 2019 हा या वर्षाचा शेवटचा दिवस असुन आजच्या दिवशी दारु पिऊन वाहन चालवू नये, अत्याधिक मद्यसेवनामुळे किरकोळ कारणावरुन मोठे वाद झाल्याचे दिसुन येते, आज रोजी दारु पिऊन वाहन चालविल्यास वाहन चेकिंग करिता खामगाव शहरात विविध ठिकाणी नाकाबंदी लावण्यात आली असुन महत्वाचे ठिकाणी फिक्स पॉईंट लावण्यात आले आहे. दारु पिऊन वाहन चालविणा-या वाहन चालकांचे अल्कोहोल मापक यंत्र (ब्रिथ ॲनालायसर) व्दारे तपासणी करण्यात येणार आहे. तपासणीमध्ये अल्कोहोल घेवुन वाहन चालविल्याचे दिसुन आल्यास अशा वाहन चालकांविरुध्द तात्काळ गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.
खामगाव शहर पोलीस स्टेशनचे वतीने खामगाव शहर वासीयांना आवाहन करण्यात येते की, उत्साहाच्या भरात आपल्या हातुन कोणतीही चुक होणार नाही, याची दक्षता घ्यावी व नविन वर्षाचे स्वागत आपल्या पुढील जीवनात आनंद येईल, अशाच प्रकारे करावे. असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.