नवी दिल्ली (वृत्तसंस्था) माजी मंत्री एकनाथ खडसे हे दिल्लीत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेण्यासाठी गेले होते. मात्र पक्षश्रेष्ठींनी त्यांना भेटण्यासाठी वेळ दिली नाही. त्यामुळे भाजप नेत्यांनी खडसेंची भेट मुद्दाम टाळल्याची चर्चा आहे.
दिल्लीत महाराष्ट्राचे प्रभारी भुपेंद्र यादव यांच्याकडे एकनाथ खडसेंनी वेळ मागितली होती. मात्र भाजप पक्षश्रेष्ठींकडून एकनाथ खडसे यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. तसेच त्यांना भेटण्यासाठी वेळ नसल्याचेही सांगण्यात आले. तर भुपेंद्र यादव यांच्याशी फोनवर बोलणे झाले. त्यांनीही हा विषय समोर नेण्याचे वचन दिले. तसेच अनेक नेते संसदेत व्यस्त असल्याने ही भेट झाली नाही. असे खडसेंनी स्पष्ट केले. भाजपचे वरिष्ठ नेते एकनाथ खडसे गेल्या काही दिवसांपासून भाजपवर जाहीर नाराजी व्यक्त करत आहेत. एकनाथ खडसे यांनी सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. शरद पवारांच्या दिल्लीत निवासस्थानी खडसे-पवारांमध्ये भेट झाली. यावेळी त्यांनी एकमेकांशी अर्धा तास चर्चा झाली. यानंतर उद्या (10 डिसेंबर) एकनाथ खडसे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत.